एकाग्रता सुधारण्याच्या काही महत्वपूर्ण टिप्स
     आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांची हि नेहमीचीच तक्रार असते कि "आम्ही वाचलेलं आमच्या लक्षात राहत नाही. अशी काही तरी क्लृप्ती पाहिजे कि वाचलेलं सर्व जसेच्या तसे लक्षात राहील." मित्रांनो आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक विद्यार्थी बघितले असतील किंवा आपल्याला देखील अशा स्वरूपाचा अनुभव आला असेल. मित्रांनो ज्यावेळी आपण एखादे प्रकरण वाचण्यास सुरुवात करतो, त्यावेळी आपल्या मनामध्ये अनेक विचार येतात, खरेतर या वेगवेगळ्या विचारपद्धती आपल्याला आपण वाचलेलं लक्षात राहण्यास अडथळा निर्माण करत असतात. मित्रांनो याठिकाणी एक गोष्ट विषद करावीशी वाटते ती म्हणजे 'आपल्या प्रत्येकाकडे लक्ष केंद्रित करण्याची भरपूर क्षमता असते.' अशा वेळेचा विचार करा जेव्हा आपण खरोखर आपल्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टीत रमत असतो, उदा. मोबाईलवर गेम खेळणे, विविध प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर करणे, चित्रपट बघणे, खेळ खेळणे,इ. यावेळी आपल्या मनामध्ये क्वचितच इतर प्रकारचे विचार येत असतात. यावेळी आपली एकाग्रता वाखाणण्याजोगी असते. मग पुस्तक वाचण्यास घेतल्यावरच असे काय होते कि, आपल्या मनामध्ये विचारांचे अगदी काहूरच माजते. यावर काय उपाय आहे ? तर यावरच आपण येथे विश्लेषण करणार आहोत.

how to concentrate on studies in Marathi

जागेची निवड -
आपल्या अभ्यासाच्या एकाग्रतेवर प्रभाव टाकणारा हा महत्वपूर्ण घटक आहे. आपण ज्याठिकाणी अभ्यास करण्यास बसणार आहात, त्याठिकाणी चांगला प्रकाश, बसण्याची व्यवस्थित सोय, स्वच्छ ठिकाण व आनंददायी वातावरण असण्याची खात्री करून घ्या. हे घटक आपल्या एकाग्रतेवर महत्वपूर्ण फरक करतात. आपण अभ्यासाला बसण्याची जागा जर अस्वच्छ असेल, पुरेसा प्रकाश नसेल, बसण्याची व्यवस्थित सोय नसेल किंवा आपण जर झोपून अभ्यास करत असू तर हे घटक आपल्या एकाग्रतेवर नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे वरील बाबींचे भान असू द्या.

मोबाईलचा वापर -
ज्यावेळी आपण अभ्यास करण्यास सुरुवात करू, त्यावेळी शक्यतो आपला मोबाइल बंदच करणे योग्य होईल. कारण मोबाईल आपल्या एकाग्रतेवर परिणाम करणारे सर्वात महत्वाचे साधन आहे. आपण कितीही विचार केला तरी १५ मिनिटांतून, ३० मिनिटांतून, कोणी कोणी असेही विद्यार्थी आहे कि ते ५-५ मिनिटांतून आपल्या मोबाईलमध्ये लक्ष घालतात. त्यामुळे मग Whatsapp झाले कि Facebook, Facebook झाले कि Instagram, Instagram झाले कि Youtube, Youtube झाले कि Telegram अशा या प्रवाहात आपण वाहत जातो, व कधी १ ते २ तास झाले हे कळून शुद्ध येत नाही. त्यामुळे अभ्यासास सुरुवात करण्याअगोदर आपला मोबाईल बंदच केलेला बरा......
how to concentrate on studies in Marathi, concevtrate on studies, concentrate on studies, abhyasavar laksha kase kendrit karave.
how-to-concentrate-on-studies-in-marathi

आवडते संगीत ऐका -

मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक अतिशय महत्वाची क्लृप्ती सांगणार आहोत कि ज्याच्या मदतीने आपण अभ्यासास सुरुवात करण्याअगोदरच अतिशय प्रसन्न झालेले असू. मित्रांनो ज्यावेळी आपण अभ्यास सुरुवात करणार आहात, त्याच्या किमान ५ ते १० मिनिटांअगोदर एक तुम्हाला आवडणारे गाणे, संगीत ऐका. याने तुमच्या मनामध्ये उत्पन्न होणारे इतर प्रकारचे सर्व विचार क्षणार्धात नष्ट होतील. त्यामुळे एकाग्रता सुधारण्यासाठी निश्चितच आपल्याला या गोष्टीचा फायदा होईल. हि क्लृप्ती शक्यतो तुम्हाला कोणी सांगितली नसणार. एकदा हि पद्धत वापरून पहा, निश्चितच तुम्हाला फरक जाणवेल.

आपली ऊर्जापातळी लक्षात घ्या -
मित्रांनो आपण ज्यावेळी अभ्यास करतो, त्यावेळी कोणती तरी एक वेळ अशी असते कि त्यावेळी आपल्या ऊर्जेमध्ये आश्चर्यकारक रित्या वाढ झालेली असते. ती वेळ अशी असते कि आपण जे वाचतो ते कुठल्याही विशेष प्रयत्नांशिवाय आपल्या जसेच्या तसे लक्षात राहते. आपल्याला हि वेळ लक्षात ठेऊन त्या वेळेला आपल्याला चिकटूनच राहायचे आहे. म्हणजेच ती वेळ कोणत्याही परिस्थितीत वाया जाऊ द्यायची नाही.

एक योजना बनवा -
आपण अभ्यास सुरु करण्यापूर्वी, आपणास काय वाचायचे आहे त्याबद्दल विचार करण्यासाठी काही मिनिटे वेळ द्या. त्या कालावधीत आपले ध्येय निश्चित करा कि किती पानाचे आपणास वाचन करावयाचे आहे किंवा वेळ मर्यादा सेट करा. यामुळे आपले ध्येय निश्चित करण्याकडे आपला कल राहील व आपले अवचेतन मन उपलब्ध वेळेत कार्य पूर्ण करण्यास प्रारंभ करेल.

ब्रेक घ्या -
संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे कि जेव्हा लोक अल्प कालावधीसाठी अभ्यास करतात तेंव्हा तो दीर्घ कालावधीसाठी आपल्या लक्षात राहतो. त्यामुळे अभ्यास करताना जास्तीत जास्त वेळ अभ्यास करण्याऐवजी ४५ ते ६० मिनिटांपर्यंत अभ्यास करणे कधीही चांगले. त्यानंतर आपण जे शिकलात त्याचा ५ मिनिटांत आढावा घेऊन मग ५ ते १० मिनिटे विश्रांती घ्या.

विविधांगी पर्याय वापरा -
दिवसातून किमान १ तास आपल्या नेहमीच्या अभ्यासाच्या धोरणात बदल करून वेगळा पर्याय वापरून पहा. यामुळे आपल्याला कंटाळा येणार नाही व आपल्याला एकाग्र राहण्यास वेगाने मदत होईल.

     प्रत्येक वेळी आपण आपले विचार भटकताना लक्षात आल्यावर "Stop" असे आपल्या मनाला निर्देश द्या. मग जाणीवपूर्वक आपल्या विचारांना आपल्या अभ्यासाकडे वळवा. सुरुवातीला, आपल्याला प्रत्येक अभ्यासाच्या सत्रात असे बरेच वेळा करावे लागेल, परंतु सरावाने आपल्याला दीर्घ कालावधीसाठी लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.

तर मित्रांनो ह्या काही महत्वपूर्ण टिप्स होत्या, ज्या तुम्हाला आपली एकाग्रता सुधारण्यासाठी मदत करतील. याठिकाणी अनेकांचे असे म्हणणे असेल कि फक्त याच टिप्स आहेत का ? इतरही भरपूर टिप्स आहे एकाग्रता वाढवण्याच्या! मित्रांनो आम्ही येथे ज्या महत्वपूर्ण टिप्स आहेत त्या देण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपल्याला याबाबतीत काही शंका असेल तर कृपया कंमेंट करून आम्हाला कळवा.

how to concentrate on studies in marathi