Tropic of Cancer Passes which the Indian States, Here we are going to see this information from which of the Indian states that Tropic of Cancer gone. You will see the list of those states here. 
Tropic of Cancer Passes which the Indian States

भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले आहे ?

जर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर लक्षात ठेवताना अडचणी येत असतील तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला याठिकाणी अशी काही क्लृप्ती सांगणार आहोत कि ज्याच्या मदतीने आपण या प्रश्नाचे उत्तर कधीच विसरणार नाही. मित्रांनो आपल्या सर्वाना हे माहिती आहे कि कधी कधी १-१ गुण देखील अतिशय महत्वाची भूमिका निभावतो. त्यामुळे आपण महत्वपूर्ण प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता त्यांचा व्यवस्थित पणे अभ्यास करून कुठल्याही परीक्षेस सामोरे जाणे संयुक्तिक ठरेल यात शंकाच नाही. आपण
या व्यासपीठाच्या मदतीने अशाच स्वरूपाच्या नवनवीन क्लृप्त्या येथे शिकणार आहोत, त्यामुळे आपण वेळोवेळी येथे भेट देऊन माहिती ग्रहण करा. मित्रांनो जास्त वेळ न घेता जाणून घेऊया कि कोणती ती ट्रिक्स आहे कि, ज्याचा मदतीने आपण अगदी सहजपणे भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेले आहे ते अगदी सहजपणे लक्षात ठेवू शकतो.

Tropic of Cancer Passes which Indian States
Tropic of Cancer Passes which the Indian States

कर्कवृत्त भारतातील ज्या राज्यातून गेले आहे त्या राज्यांची यादी खालीलप्रमाणे -
कर्कवृत्त भारतातील एकूण ८ राज्यातून गेलेले आहे. ती राज्य अशी -

मिझोराम
छत्तीसगढ
गुजरात
राजस्थान
मध्य प्रदेश
पश्चिम बंगाल
त्रिपुरा
झारखंड
 

भारतातील ज्या ज्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले आहे ती राज्य वरीलप्रमाणे आहेत. आता आपण अगदी सहजपणे या राज्यांची यादी कशी लक्षात ठेवायची हि बघूया.

मित्रांनो जर आपण वरील प्रमाणे प्रत्येक राज्यांच्या नावाचे आद्याक्षर घेतले तर एक नवीन व अतिशय कल्पक नाव तयार होते, ते कोणते -
"मि छ गु रा म प त्रि झा" 

म्हणजेच मि पासून मिझोराम, छ पासून छत्तीसगढ अशा प्रकारे सर्व राज्यांची आद्याक्षरे घेऊन मिछगुरामपत्रिझा हे नाव तयार होते. आपण फक्त हा शब्द "मिछगुरामपत्रिझा" लक्षात ठेवला तरी आपले भारतातील कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेले या प्रश्नाचे उत्तर १०० टक्के बरोबर येईल.

तर मित्रांनो बघितले किती सोपी पद्धत आहे. आम्हाला विश्वास आहे कि आपल्याला हि क्लृप्ती निश्चितच आवडली असणार !

मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या अशाच टिप्स व ट्रिक्स साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला अवश्य भेट द्या. आम्ही येथे नवनवीन जाहिरातींबरोबरच अशा परीक्षाभिमुख टिप्स व ट्रिक्स देण्याचा प्रयत्न करत असतो. हि माहिती आपल्या मित्र व मैत्रीणींना जरूर Share करा.