In this article, we will look at how to focus on the study? how to concentrate on studies in Marathi? Know More About How to focus on study.

     बहुतेक वेळा आपल्यापैकी कित्येक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची इच्छा असते मात्र ते अभ्यास करण्यास बसले कि मन एकाग्र करू शकत नाही. त्याचा परिणाम म्हणजे एकतर जे काही वाचले आहे ते लक्षात येत नाही किंवा आपण वाचन करण्याचेच सोडून देतो.

How to Concentrate on Study in Marathi
how to concentrate on studies
     विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपल्याला आपले मन एकाग्र कसे राहील याची काळजी घेणे महत्वाचे असते. विविध विद्यार्थी या महत्वाच्या बाबीकडे अजिबात लक्ष देताना दिसत नाही. अभ्यास करताना जर मन एकाग्र नसेल तर आपण कितीही वाचन केले तरी ते निष्फळ होण्याची भीती असते.

     अभ्यास करताना मन एकाग्र करण्याच्या टिप्स तरी काय आहे? असे जर कोणी विचारले तर असे सांगता येईल कि आपल्या अभ्यासावर व आपल्या एकाग्रतेवर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, त्यापैकी आपण येथे काही बाबींचा आढावा घेणार आहोत.


अभ्यास / वाचन करण्याची जागा

     आपल्यापैकी कित्येक विद्यार्थी असे म्हणत असतील कि जर इच्छा असेल तर कोठेही अभ्यास करता येतो. मात्र हे सत्य आहे कि आपल्या एकाग्रतेवर परिणाम करणारी सर्वात महत्वाची बाब जी असेल तर ती आपण अभ्यास करण्यास निवडलेली जागा.

     जर आपण अभ्यास करण्यास निवडलेली जागा जर शांत, प्रसन्न असेल, तसेच तेथे प्रकाशाची पुरेपूर व्यवस्था असेल, तेथील बैठक व्यवस्था उत्तम प्रकारची असेल तर आपले अभ्यासात मन रमण्याची शक्यता जास्त असते. मात्र जर आपल्या अभ्यासाची जागा हि अस्वच्छ, गोंगाटाची असेल तर आपण कितीही ठरवले तरी आपले अभ्यासावर लक्ष केंद्रित होणे अवघड होऊन बसते.

अवरोधित गोष्टींचा कमी वापर

     आपल्या सर्वांकडे मोबाईल, आयपौड, टीव्ही किंवा इतर विविध प्रकारची साधने असू शकतात, जी आपल्या एकाग्रतेवर परिणाम करू शकतात. या सर्व बाबी मन एकाग्र करून अभ्यास करण्यासाठी व्यत्यय निर्माण करतात. 

     आमचे हे म्हणणे मुळीच नाही कि या सर्व गोष्टीनी तोटाच होतो आणि या साधनांचा वापर एकदम बंद करा, मात्र या साधनांचा कमीत कमी वापर आपण केला पाहिजे. त्याने निश्चितच आपले अभ्यासावर लक्ष केंद्रित होणे सोपे होईल. 

नोटस घेण्याचा प्रयत्न करा

     आपण ज्या ज्या वेळी वाचन करू त्या त्या वेळी आपण शक्यतो नोटस घेण्याचा प्रयत्न करावा. याने अभ्यासात विविधता निर्माण होऊन आपल्याला अभ्यासात विशेष गोडी येईल. त्यामुळे शक्यतो वाचन करताना नेहमी नोटस घेणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. 

     आता याठिकाणी नोटस घेताना आपण एक गोष्ट करू शकतो, ते म्हणजे वेगवेगळ्या शाईचा वापर. म्हणजेच मुख्य मुद्दा लिहिताना वेगळ्या शाईचा वापर. त्यातील सामुग्री [Content] लिहिताना वेगळ्या शाईचा वापर करणे. यामुळे देखील आपले अभ्यासावर लक्ष केंद्रित होण्यास मदत होते.

हे हि वाचा - उत्तम नोटस काढण्याचा काही महत्वपूर्ण टिप्स


अभ्यास करण्याचा कालावधी

     आपल्यापैकी कित्येक स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी एकदा अभ्यासाला बसले कि किमान चार ते पाच तास ते वाचन करत बसतात. मात्र हि चुकीची पद्धत आहे. शेवटी बसून म्हटले तरी आपले शरीर आणि मेंदू थकणारच ना ! 

     त्यामुळे आपल्या अभ्यासाची वेळ जास्तीत जास्त 45 ते 50 मिनिटांपर्यंत मर्यादित ठेवा. त्यामध्ये किमान 5 मिनिटांचा तरी ब्रेक घ्या. याने आपल्या मेंदू व शरीराला थोडा आराम मिळून पुन्हा त्याच तजेलदारपणाने आपल्याला अभ्यास करता येईल.

हे हि वाचा - एकाग्रता सुधारण्याच्या महत्वपूर्ण टिप्स आणि ट्रिक्स

तर मित्रांनो या आहेत त्या टिप्स आणि ट्रिक्स ज्याने आपले अभ्यासावर लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. याठिकाणी आमचे हे म्हणणे नाही कि फक्त याच टिप्स आहेत ज्याने आपले अभ्यासावर लक्ष केंद्रित होते. परंतु आम्ही येथे महत्वपूर्ण टिप्स देण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याचा विविध परीक्षार्थीना विविध परीक्षेमध्ये उपयोग होईल.

जर हा लेख आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना जरूर Share करा.