Frequently Ask Question
---------------------------

1) Free NMK म्हणजे काय?

उत्तर - Free NMK म्हणजेच Free Naukri Margdarshan Kendra. याचाच अर्थ या व्यासपीठावर उपलब्ध करून दिली जाणारी माहिती हि शक्यतो मोफत असते.

2) मला Free NMK वर कोणती सामुग्री [Content] मिळेल?

उत्तर - Free NMK वर आपल्याला विविध स्वरूपाच्या नवनवीन सरकारी नोकरीच्या जाहिराती, स्पर्धा परीक्षेशी संबंधित घोषणा, प्रवेशपत्रे, अभ्यासक्रम, निकाल तसेच इतर अभ्यासविषयक माहिती मिळेल.

3) मी या संकेतस्थळावर आल्यावर मला कोणते नियम पाळावे लागतील?

उत्तर - ज्यावेळेस आपण या संकेतस्थळावर कोणत्याही माध्यमातून येता, त्यावेळी आपल्याला निश्चितच काही नियम पाळावे लागतात. त्यासाठी खाली काही लिंक दिल्या आहेत. त्याचे काळजीपूर्वक वाचन करा.

4) या संकेतस्थळावर दिल्या जाणाऱ्या माहितीची आपण ग्वाही देता काय?

उत्तर - www.FreeNMK.com या संकेतस्थळावर दिल्या जाणाऱ्या माहितीची आम्ही ग्वाही देत नाही. कारण यावरील माहिती हि विविध इतर संकेतस्थळ, वृत्तपत्र तसेच इतर माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो. जलद पद्धतीने माहिती देताना कधी कधी चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना हि सूचना केली जाते कि, त्यांनी या संकेतस्थळावर दिल्या जाणाऱ्या माहितीची पडताळणी करूनच त्याचा उपयोग करावा. 
या संकेतस्थळाच्या कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या माहितीमुळे जर कुणाचे कोणत्याही प्रकारातील नुकसान झाले तर त्यास हे संकेतस्थळ व त्यासंबंधित असणाऱ्या व्यक्ती जबाबदार असणार नाहीत.

5) आपण या संकेतस्थळाची सामाजिक माध्यमे [Social Media] चालवता काय?

उत्तर - हो. आम्ही या संकेतस्थळाची विविध स्वरूपाची सामाजिक माध्यमे [Social Media] चालवतो. त्याची आपल्याला या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर लिंक मिळेल.

6) आपण Whatsapp Group चालवता काय?

उत्तर - हो आम्ही या संकेतस्थळाचे अधिकृत Whatsapp Group चालवतो.

7) आपल्या Whatsapp Group ला जॉईन होणाऱ्या सदस्यांच्या मोबाईल नंबर, फोटो तसेच इतर वैयक्तिक माहितीची आपण सुरक्षित असल्याची खात्री देता काय?

उत्तर - ज्यावेळेस आपण आमच्या Whatsapp Group ला जॉईन होता, त्यावेळेस आम्ही तुमच्या मोबाइल नंबर, फोटो, तसेच इतर वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेची कोणतीही हमी देत नाही. Whatsapp Group मध्ये सामील झाल्यावर इतर व्यक्ती आपला मोबाईल नंबर, प्रोफाइल पिक्चर पाहू व डाउनलोड करू शकतात. मात्र त्यावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. भविष्यात आमच्या Whatsapp Group ला सामील होऊन जर आपल्या मोबाईल नंबर, प्रोफाइल पिक्चर तसेच इतर माहितीचा गैरवापर झाला तर त्यास आम्ही कदापिही जबाबदार असणार नाही. ती सर्वस्वी जबाबदारी स्वतः त्या व्यक्तीची असेल. Whatsapp Group ला जॉईन होताना आपण या बाबीचे विवेचन केले पाहिजे.

8) Whatsapp Group ला सामील न होता मला रोज आपल्या संकेतस्थळाचे अपडेट मिळेल का?

उत्तर - हो नक्की. त्यासाठी आपल्याला आमच्या www.freenmk.com या अधिकृत संकेतस्थळाला दररोज भेट द्यावी लागेल.

9) Free NMK हे संकेतस्थळ एखादी संस्था किंवा क्लासेस चालवते काय?

उत्तर - नाही. Free NMK हे संकेतस्थळ कुठलीही संस्था तसेच क्लासेस चालवत नाही. जर एखादी संस्था व क्लास आमचे नाव सांगून आपल्याला सेवा देण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यापासून होणाऱ्या कोणत्याही नुकसान, हानीस आम्ही जबाबदार असणार नाही.
जर कोणी आपल्याला आमच्या संकेतस्थळाचे नाव सांगून लुबाडण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपण तात्काळ आमच्याशी संपर्क साधा व खात्री करा.

10) स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आपल्या भविष्यात काही योजना आहेत का?

उत्तर - मुळात www.freenmk.com हे संकेतस्थळ आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थाना मोफत मागर्दर्शन मिळावे, या हेतून सुरु केले आहे.
आमचा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही योजना सुरु करण्याचा मानस आहे, मात्र त्या आम्ही भविष्यात आपल्याला या संकेतस्थळाच्या माध्यमातून कळवू.

11) मला जर आपण एखाद्या विषयासंदर्भात दिलेली माहिती आवडली तर मी आपल्याला कसे कळवू शकतो?

उत्तर - अतिशय सोपे आहे. आपण त्याच लेखाच्या शेवटी आपली बहुमूल्य सूचना [Comment] लिहून आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवू शकता.

12) मला काही शंका, मदत तसेच इतर माहिती हवी असेल तर मी आपल्याशी कशा प्रकारे संपर्क साधू शकतो?

उत्तर - जर आपल्याला परीक्षाविषयक शंका, मदत तसेच इतर काही माहिती हवी असेल तर आपण आमच्याशी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आम्ही लवकरात लवकर आपल्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करू.